१. सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.
२. शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असतं ह्याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझ झटकता येते. कारण पदवीपुरातच त्या हॉलशी संबंध असतो. पण जगताना शब्द जेव्हा झटकता येत नाहीत तेव्हाच त्याचा खरा अर्थ समजतो.
Author – Va. Pu. Kale.
Book - Mayabazaar
No comments:
Post a Comment