Monday, December 06, 2010

मराठी माणसाला काय येत?

मराठी माणसाला काय येत?

मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं,
मराठी माणसाला स्वातंत्र्यासाठी भर समुद्रात झोकून देता येतं,
मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते
मराठी माणसाला भारतीय राज्य घटना लिहिता येते
मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं
मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो
मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं
मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते
मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं
मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं
मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.....
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.... .....!!!!!

No comments:

+1

You Tube